Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा तैनात

सहा हजार पोलिसांचा फौजफाटा; आजपर्यंत ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पिंपरी चिंचवड | पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सह पोलीस आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, विविध पथकांच्या कंपन्यांसह ६ हजार ९१ पोलीस सज्ज असणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ५० उपद्रवींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर, गुंडगिरी प्रवृत्तीच्या ४३८ जणांना पिंपरी – चिंचवड हद्दीबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १३०६ पिस्तुले जमा केली आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त, सह आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त यांच्यासह ६ हजार ९१ पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणार्‍या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणार्‍या केंद्रांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.

महापालिका निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिस दल सज्ज झाले आहेत. सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४२० इमारतींमध्ये २१३५ मतदान केंद्र आहेत. आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण ३४ तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याकरीता ६८ पोलीस अंमलदार नेमण्यात आलेले आहेत. आजपर्यंत पोलीस Dाायुक्तालय हद्दीत दैनंदीन तपासणी दरम्यान एकूण १६ लाख १७ हजाराची रोकड जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १ हजार ३०६ पिस्तुले जमा केली आहेत. एकूण १२ ठिकाणी पोलीसांनी रूट मार्च करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात गुन्हेगार चेकिंग, गस्त, नाकाबंदी व रुट मार्च अधिक तीव्र करण्यात येणार असून असमाजिक व्यक्ती व गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा      :                १७ लाख १३ हजार मतदार बजविणार मतदानाचा हक्क 

अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई

आचारसंहिता लागू झाल्यापासून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत २७६ छापे घालून एकूण १० लाख ३६ हजार ९७२ रूपये किमतीचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यांअंतर्गत १८ छापे घालून एकूण ६६ लाख १९ हजार रूपये किमतीचा गांजा, एमडी, ओजी कुश गांजा असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. नऊ बेकायदा पिस्तुले जप्त केली असून ११ जणांना अटक केली आहे.

पोलिस बंदोबस्त

पोलिस सह आयुक्त : १
अपर पोलिस आयुक्त : २
पोलिस उपायुक्त : ८
सहायक पोलिस आयुक्त : ११
पोलीस निरीक्षक : ४८
सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक : २९१
अंमलदार : ३७३३
होमगार्ड : २०००
दंगा नियंत्रण पथक : ४
शिघ्र प्रतिसाद दल : २ कंपनी
राज्य राखीव पोलिस दल : १ कंपनी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निवडणुकीच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक ही निर्भय वातावरण, निप:क्षपाती, शांतता व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय सुसज्ज आहे. नागरिक पोलिसांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न घाबरता देऊ शकतात. पोलिसांना येणार्‍या प्रत्येक कॉलची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तसेच, सर्व नागरिक, कार्यकर्ते यांनी नियमांचे पालन करून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे.

– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button