Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: सांगवी-किवळे रस्त्यावर रक्षक चौक ‘सब-वे’ च्या कामाला गती!

महापालिका प्रशासन: विहीत मुदतीत काम पूर्ण करण्याचे नियोजन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत महत्त्वाच्या संरचनात्मक टप्प्यांपैकी काही टप्पे पुर्णत्वास आले आहेत. याशिवाय आरसीसी बॉक्सच्या पायाच्या खोदाई चे काम अंतिम टप्प्यात आले असून, दोन्ही बाजूंच्या रॅम्पच्या बांधकामास वेग देण्यात आला आहे. सबवे प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर नागरिकांना सुलभ आणि अडथळाविरहीत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

सद्यस्थितीत सबवेच्या आरई पॅनलचे ८० टक्के कास्टिंगचे काम पुर्ण झाले असून पायाभूत सुविधा, जलनि:सारण व्यवस्था आणि मार्ग संकेतांक बसवण्याचे काम सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक तात्पुरत्या पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

हेही वाचा – शहरातील वाहनांची संख्या वाढली! २०२४-२५ वर्षात तब्बल इतकी वाहन खरेदी

प्रकल्पाचे स्वरूप

•एकूण लांबी: ३६३ मीटर
•औंध बाजूकडील रॅम्पची लांबी: १२५ मीटर
•सबवेची लांबी : १८ मीटर
•जगताप डेअरी चौक बाजूकडील रॅम्पची लांबी: २२० मीटर
•सबवेची रुंदी : २६.४ मीटर
•सबवेची उंची : ५.५ मीटर
•निविदा रक्कम : १८ कोटी ६५ लाख

प्रकल्पामुळे प्रवाशांना होणारे लाभ

सांगवी-कवळे मार्ग हा पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांना जोडणारा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिक विकासामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच, बीआरटी बससेवा, शालेय बसेस आणि रोजच्या चाकरमान्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी, भविष्यात या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता सबवे उभारण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी सबवे खुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन इंधन आणि वेळेची बचत तर होईलच शिवाय पर्यावरणीय हानी टाळण्यास देखील मदत होणार आहे. विशेषतः पुणे, औंध व मुंबई, रावेत मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग विनाविलंब आणि विनाअडथळा खुला राहील. परिणामी, पिंपळे निलख गावठाणामध्ये जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी देखील टाळता येईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

रक्षक चौकात उभारण्यात येणाऱा सबवे म्हणजे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि विनाअडथळा वाहतूक मिळावी हा यामागचा उद्देश आहे. प्रदूषण आणि इंधनाच्या बचतीबरोबरच, हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल. संबंधित विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

रक्षक चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा सबवे प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे, औंध, रावेत आणि मुंबईच्या दिशेने वाहने विनाअडथळा प्रवास करू शकतील, परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल व प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटेल. तसेच, पिंपळे निलख गावठाणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील सुरक्षित वळण घेणे शक्य होईल.

– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button