PCMC: विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे ‘‘ॲक्शन मोड’’वर!
पिंपळे सौदागर- रहाटणीमध्ये भाजपाचा पायाभूत सोयी-सुविधा सक्षमीकरणाचा संकल्प
पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी तिन्ही नगरसेवकांची मॅरेथॉन बैठक पार पडली. निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिताताई काटे व नगरसेविका कुंदाताई भिसे हे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये असून, विकासकामांना गती देण्यासाठी पालिका यंत्रणेला थेट धारेवर धरले.
या आढावा बैठकीदरम्यान प्रभागातील रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट्स तसेच उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेवकांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि ठराविक कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
तिन्ही नगरसेवकांनी सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेबाबत व प्रगतीबाबत सखोल आढावा घेतला. नागरिकांना होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्टपणे बजावण्यात आले.
विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. या पाहणी दौऱ्यास अनिताताई काटे, कुंदाताई भिसे, जयनाथशेठ काटे, संजयशेठ भिसे, संदिपशेठ काटे यांच्यासह संबंधित विभागांचे पालिका अधिकारी व कामांचे कंत्राटदार उपस्थित होते.
“प्रभाग २८ मधील नागरिकांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही. पालिका यंत्रणेने ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून पाठपुरावा करत राहू.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





