पवना धरण १०० टक्के भरले, ४३२० क्युसेक्सने विसर्ग सुरू
पिंपरी : पवना धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून २२२० क्युसेक्सने विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होता. रात्री ९ वाजल्यानंतर त्यात वाढ करण्यात आली असून विसर्ग ४३२० क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणलोट क्षेत्रामधील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता रात्री ९ वाजल्यापासून सांडव्याद्वारे विसर्ग वाढवून ४३२० क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सांडव्यावरील विसर्ग वाढवल्यानंतर नदीपात्रामध्ये एकूण ४३२० क्यूसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये होणार आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची पकड मजबूत, विधानसभेत तीनही मतदार संघात ‘महायुती’ जिंकणार!
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.