ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | ८६० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

अभय योजनेचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात (दि. १ एप्रिल २०२५ ते २४ मार्च २०२६) तब्बल ८६० कोटी ५९ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले असून, ज्या थकबाकीदार नागरिकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ५ दिवस शिल्लक राहिले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ७२ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तथापि, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

हेही वाचा      :          To The Point: मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी नगरसेविका सुलभा उबाळे यांची हमरीतुमरी!

वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली

कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २३ मार्च २०२६ या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने १०६ कोटी १२ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर थेरगाव ८७ कोटी ४९ लाख, चिखली कार्यालयाने ७४ कोटी १० लाख, किवळे ५९ कोटी ८६ लाख, भोसरी ५६ कोटी ३४ लाख,कस्पटे वस्ती ५५ कोटी ८६ लाख, मोशी ५५ कोटी ४५ लाख, चिंचवड ५४ कोटी १९ लाख, पिंपरी वाघेरे ४७ कोटी ६०, सांगवी ४२ कोटी ७६ लाख, मनपा भवन ३८ कोटी ९६ लाख, आकुर्डी ३७ कोटी ९० लाख, चऱ्होली ३४ कोटी ५७ लाख, , फुगेवाडी दापोडी ३३ कोटी ६९ लाख, दिघी बोपखेल २५ कोटी ५० लाख, तळवडे २३ कोटी ३५ लाख,निगडी प्राधिकरण १९ कोटी २३ लाख, पिंपरी नगर ७ कोटी ६२ लाख.

पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी महापालिकेच्या विकासकामांना साथ देत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर भरून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही बाब शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या नागरिकांकडे थकबाकी आहे त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन विलंब दंडात मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा आणि आपला कर तात्काळ भरावा.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

कर संकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. अभय योजनेअंतर्गत दिली जाणारी ९० टक्के सवलत ही नागरिकांसाठी मोठी संधी असून, थकबाकीदारांनी या कालावधीत कर भरून दंडमाफीचा लाभ घ्यावा. तसेच कर न भरणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.

– डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button