निगडीकरांसाठी गुड न्यूजः आता दहावी-बारावीच्या परीक्षा होईपर्यंत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम बंद राहणार
भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांच्या मागणीला यश, महा मेट्रो प्रशासनाने घेतली दखल

पिंपरी-चिंचवड : महा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम पिंपरी ते निगडी या मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असून, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प काम बंद करण्यात यावे रात्री मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या ड्रिल मशीन ने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यामुळे खुप मोठा आवाज येत असून, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीची झोप मोड होत असते. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी नीट अभ्यासही करता येत नाही ना नीट झोप घेता येत. नाहक त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आजूबाजूला रुग्णालय, नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर असून, रात्रीच्या वेळी मेट्रो रेल्वे काम त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा 22 फेब्रुवारी रोजी निगडी येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे रात्रीच्यावेळी हे काम बंद ठेवावे, अशा मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांनी महा मेट्रो प्रशासनास दिले होते. या निवेदनाची महा मेट्रो प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ह्या संदर्भात मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी ह्यांनी स्वतः ताबडतोब दखल घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी येऊन पाहणी करून निर्णय घेण्यात यावा. नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचा हा प्रकार असून, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रात्री झोप घेण्यासाठी मेट्रो रेल्वे काम अडचण होत असते.
हेही वाचा : आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
काळभोर यांच्या सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घेत महामेट्रो प्रशासनाने पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे काम रात्री बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात पुणे मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली ड्रिल मशीन पोकलॅण्डने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत होते ते कामं रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असून त्या संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती दहावी बारावी परीक्षा सुरू असून शाळेच्या विद्यार्थ्यांना मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत असल्याने मोठा आवाज येत होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना झोप पुरेशी मिळत नव्हती त्या संदर्भात पुणे मेट्रो रेल्वे अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम दहावी बारावी परीक्षा काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेट्रो कामाच्या आवाजामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडथळा निर्माण होत असून, खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे यांनीदेखील, सचिन काळभोर यांच्या मागणीला समर्थन देऊन मेट्रो रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून हे काम रात्री बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मेट्रो अधिकाऱ्यांनी काम बंद ठेवण्यात आल्याचे समजते.