पाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“भावनिक बुद्धिमत्ता” विषयावर राष्ट्रीय परिषद

शिक्षण विश्व : तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा भरघोस प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित “भावनिक बुद्धिमत्ता” या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व समुपदेशक डॉ. नंदू मुलमुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भावनिक बुद्धिमत्तेचे वैयक्तिक, सामाजिक तसेच व्यावसायिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा :    गाड्या घेणं महागणार, पर्यावरण कर दुपटीने वाढवला

या परिषदेत डॉ. सुमिता सातारकर, डॉ. नीता गाडे, डॉ. उन्नती कोळी, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, डॉ. तन्वी नाईक, डॉ. नीकिता भगवानी, डॉ. गीता होनराव, श्रुती सेठ आणि डॉ. मिनल सोहनी आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, व्यावसायिक क्षेत्रातील उपयोग तसेच तणावपूर्ण परिस्थितीत भावनिक संतुलन कसे राखावे याविषयी सखोल माहिती दिली.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. शिल्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सारिका निकम व डॉ. प्रियतमा पोवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत नाईक व श्रेयशी देशमुख यांनी केले. ही परिषद यशस्वीपणे पार पडल्याबद्दल संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि) व विश्वस्त तेजस पाटील यांनी सर्व आयोजक व सहभागींचे अभिनंदन केले.

पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन …

परिषदेच्या निमित्ताने पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना समारोप सोहळ्यात डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर परिषद आयोजित केल्याबद्दल डॉ. प्रमोद पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांचे विशेष कौतुक केले.

 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button