तळेगावात नूतन कॉलेज परिसरात प्लास्टिक पाइपांना आग

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे येथे स्टेशन भागात नूतन अभियांत्रिकी जवळ रिकाम्या जागेवर ठेवलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या प्लास्टिकच्या पाइपांना आग लागण्याची घटना मंगळवारी (दि.१७) सायंकाळी सुमारे ५.१५वा. सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भडकलेल्या आगीचे ज्वाळा आणि काळ्याकुट्ट धुराचे मोठे लोळ आकाशात उसळले.
अचानक लागलेल्या आगीमुळे आणि धुराच्या लोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाली. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून
हेही वाचा – अजित पवार विमान अपघातात आगीमुळे ब्लॅक बॉक्स जळाला; नागरी उड्डाण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
तातडीने नगर परिषद अग्निशमन विभागाला कळवले. अग्नीशमन अधिकारी संतोष तेलगे आणि कर्मचारी निरंजन भेगडे,अनुपम सिंग,शुभम काळोखे,ओम भेगडे या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेवून सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.यावेळी तेथील गवतासही आग लागली होती.आगीच्या घटनेस जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकां मधून येत आहे. .या घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.




