युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू कार्यशाळेतून मानवी मूल्यांचे धडे
शिक्षण विश्व: डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आकुर्डी येथे तीन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

पिंपरी | डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आकुर्डी येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नवी दिल्ली मान्यतेने आयोजित युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळा १९ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळेला एआयसीटीई नवी दिल्लीकडून प्रमुख प्रशिक्षक डॉ महेश कोलते सहाय्यक प्रशिक्षक डॉ अनिता माने आणि निरीक्षक रेवती देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमास डॉ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ नीरज व्यवहारे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पी मालती प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत तसेच कार्यशाळेचे समन्वयक सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ अशोक मोरे यूएचव्ही अधिष्ठाता डॉ लतिका देसाई आणि ईएनटीसी विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ मनीषा राजपूत उपस्थित होते.
कार्यशाळेत समग्र विकासातील शिक्षणाची भूमिका स्वतःचा शोध ,सुख समृद्धी मानवी सुसंवाद कौटुंबिक विश्वास, कुटुंबातील आणि समाजातील सुसंवाद तसेच निसर्गाशी संतुलित नाते अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा : मुलधारा हेरिटेज क्लबची चिंचवड गावात हेरिटेज वॉक
समन्वयक डॉ अशोक मोरे यांनी तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा मांडला. मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन बिहारी शर्मा यांनी मूल्य शिक्षणामध्ये सार्वभौमिकता तर्कसंगतता सत्यापन क्षमता आणि सामंजस्य यांचा समावेश असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्राध्यापक मृणालिनी शेवाळे प्रणिता मांजरे ललितराव अमृतसागर आणि राजश्री इंगळे यांनी कार्यशाळेतून आनंद समृद्धी विश्वास यांसारख्या संकल्पनांची खऱ्या अर्थाने जाण मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले.
प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत यांनी भारतीय वेदांताच्या आधारे आनंद हा ध्येय नसून प्रवास असल्याचे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ नीरज व्यवहारे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे महत्व सांगत माणसाचा आनंद केवळ भौतिक सुखावर नव्हे तर आत्मिक समाधानावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून १२५ हून अधिक प्राध्यापकांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रुप्ती वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ लतिका देसाई यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक संकुलाचे चेअरमन सतेज पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम प्राचार्या डॉ पी मालती आणि प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.




