ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कुदळवाडीत ‘ट्रॅफिक वार्डन’ची नेमणूक करा: दिनेश यादव
वाहतूक विभाग, तळवडे यांना निवेदन : कार्यवाही होण्याची प्रतीक्षा

पिंपरी : कुदळवाडी मोरे पाटील चौक, मोईफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा मोठे अपघात होत आहे. यात नागरिकांना जीव गमवावे लागत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी आ. महेश लांडगे यांच्या माध्यमातून नवीन डीपी रस्ते उभारणीची कामे सुरू आहेत.
कुदळवाडी परिसरात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठी वर्दळ रस्त्यावर असते. वाहतूक कोंडीचा फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार यांना होत आहे.
ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी वार्डनची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी मा. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी वाहतूक विभाग, तळवडे यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेवक दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते विशाल बालघरे, काका शेळके आदि उपस्थित होते.