Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुरक्षित आणि ट्रॅफिक मुक्त रस्त्यांसाठी ‘हरित सेतू’

१५ मिनीटे शहर संकल्पनेसाठी : पायलट प्रकल्पाची निगडी येथे सुरूवात

लोकाभिमुख रस्त्यांच्या विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

शहराचा शाश्वत आणि सर्वसामावेशक विकास करण्यासाठी सुरक्षित आणि ट्रॅफिक मुक्त रस्त्यांची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला असून, या अंतर्गत हरित सेतू या पायलट प्रकल्पाची निगडी येथे सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये सायकलिंग, पायी चालण्यावर भर दिला जाईल. शहरातील प्रमुख बाजारपेठा, गर्दीची ठिकाणी आणि शाळा जवळ अर्ज सेतू प्रकल्प राबविण्यात येईल.

महापालिकेच्या नव्याने स्थापन केलेल्या शहरी दळणवळण विभागाच्या माध्यमातून हरित सेतू उपक्रम राबविला जाणार आहे. हरीत सेतु उपक्रम भविष्यात भक्ति शक्ती मेट्रो स्टेशनसाठी व आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ करण्यात येणार आहे.

तज्ञांकडून मार्गदर्शन

ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (GDCI) कडून तज्ञ प्रतिनिधी मंडळाने या भागास भेट दिली. यामध्ये तांत्रिक कार्यशाळा, डिझाईन वर्कशॉप आणि प्रत्यक्ष सहभागाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या सहकार्यात्मक दृष्टिकोनातून लोकाभिमुख रस्त्यांचे डिझाईन करणेसाठी नवनवीन कल्पना आणि तज्ञ मार्गदर्शन महापालिकेस लाभले. या प्रकल्पाच्या डिझाईनचे नेतृत्व प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स (PDA) यांनी केले असून, आशिक जैन यांचे सहकार्य त्यामध्ये त्यांना लाभले आहे. ITDP इंडिया कडून शाश्वत वाहतूक नियोजन तज्ञ मार्गदर्शन मिळाले असून संस्कृती मेनन (CEE) यांनी स्थानिक समुदायाशी संवाद साधण्यास पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा   :  पुणे विमानतळाच्या ‘कनेक्टिव्हिटी’ला गती मिळणार

असा असेल हरित सेतू

सध्या प्रायोगिक तत्वावर सुमारे १०० मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. यामध्ये पायी चालणे, सायकलिंग आणि पावसाचे पाणी व्यवस्थापन यासंबंधी असलेल्या नव्या शहरी धोरणांचा समावेश आहे. त्यामध्ये वृक्षसंवर्धनावर भर देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सुसंगतता साधण्यावर भर दिला जात आहे. रंगीबेरंगी भित्तीचित्रे, सार्वजनिक जागांचा विकास आणि विचारपूर्वक केलेली रस्त्यांची रचना यामुळे नागरिकांनी आता या सकारात्मक बदलांचे स्वागत केले आहे.

पंधरा मिनिटे शहरासाठी

हरित सेतू हा उपक्रम मुख्यत्वे शहराच्या रहदारीच्या रस्त्यांवरील गर्दी कमी करून हे रस्ते नागरिकांना सुरक्षित व्हावेत असा आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या रस्त्यांवर सायकल किंवा पायी चालता येणार आहे. कालांतराने याचा शहरभर विस्तार करण्यात येणार आहे.सध्या शाळा बाजारपेठ आणि वाहतूक केंद्रे हरित सेतूच्या माध्यमातून ट्राफिक मुक्त आणि सुरक्षित करण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी चिंचवड महापालिका शाश्वत शहरी वाहतूक आणि सर्वसमावेशक शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. हरीत सेतु उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सुरक्षित, निरोगी, आणि सर्व वयाच्या आणि क्षमतेच्या नागरिकांसाठी समावेशक रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button