ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गोसेवक रामकृष्ण महादेव लांडगे यांची मानद पशुकल्याण अधिकारीपदी निवड

संवेदनशील व कर्तव्यदक्ष गोसेवक म्हणून लांडगे यांची ओळख

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

गोसेवा, पशुसंवर्धन व पशुकल्याण क्षेत्रात दीर्घकाळ निस्वार्थ भावनेने कार्य करणारे गोसेवक श्री रामकृष्ण महादेव लांडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशुकल्याण अधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पशुकल्याण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

रामकृष्ण लांडगे हे अनेक वर्षांपासून निराधार, जखमी व आजारी जनावरांच्या सेवेत कार्यरत आहेत. अपघातग्रस्त जनावरांना तातडीची मदत, उपचार, पुनर्वसन तसेच त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी समाजात संवेदनशील व कर्तव्यदक्ष गोसेवक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा       :              पिंपरी-चिंचवड मनपाचा महसूल वसुलीत नवा विक्रम 

पशुकल्याणाबाबत जनजागृतीसाठी त्यांनी गावोगावी मार्गदर्शन करत पशुप्रेम, संवर्धन व प्राण्यांप्रती जबाबदारीची भावना निर्माण केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेत शासनाने त्यांची ही निवड केली आहे.

या निवडीमुळे पशुकल्याणाच्या कामात अधिकृत पातळीवर योगदान देण्याची संधी त्यांना मिळणार असून शासन व समाज यांच्यातील दुवा म्हणून ते अधिक प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक संस्था, गोसेवक व नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पशुकल्याणाच्या कार्यात स्वतःला झोकून देईन. निराधार, जखमी आणि आजारी जनावरांचे संरक्षण, उपचार आणि पुनर्वसन हेच माझे प्रमुख ध्येय राहील. शासन, प्रशासन आणि समाज यांच्या समन्वयातून पशुप्रेम व संवेदनशीलतेची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मी सातत्याने कार्य करत राहीन.

– रामकृष्ण महादेव लांडगे, गोसेवक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button