पिंपरी / चिंचवड

अतिक्रमणमुक्त पदपथांसाठी उपमहापौर आग्रही!

नागरिकांच्या हक्कांचे संवर्धन करा : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला निर्देश

पिंपरी-चिंचवड | शहरातील पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी कडक भूमिका घेत अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि मोकळे पदपथ सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला ठोस निर्देश दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शहरी दळण-वळण विभागात आज आयोजित बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ ठरतेय मुख्य आकर्षण

या बैठकीस प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेविका सौ. शैलजा ताई मोरे, श्री. राजू मिसाळ, श्री. अमित गावडे, मा. शहर अभियंता श्री. मकरंद निकम, कार्यकारी अभियंता श्री. चंद्रकांत मुठाळ (‘ब’ प्रभाग स्थापत्य), श्री. सुनील पवार तसेच उपआयुक्त श्री. सीताराम बहुरे उपस्थित होते.

बैठकीत हरित सेतू प्रकल्पाच्या नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील हॉकर्स झोन निश्चितीबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेल्या पार्किंग समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. हॉकर्स झोनसाठी नियमानुसार लवकरात लवकर योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, यावर उपमहापौर बाबर यांनी विशेष भर दिला.

उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “पदपथ हे पादचाऱ्यांचे मूलभूत हक्काचे साधन आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. त्याचवेळी, छोट्या व्यावसायिकांनाही न्याय मिळावा यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.” नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त पदपथ आणि विक्रेत्यांना नियमानुसार जागा — या दुहेरी उद्दिष्टांसाठी प्रशासनाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवून ठोस पावले उचलली जातील, असा निर्धार उपमहापौरांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त पदपथ मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधून ठोस आणि परिणामकारक कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर, लहान व्यावसायिकांनाही नियमानुसार योग्य जागा उपलब्ध करून देत समतोल विकास साधण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button