
पिंपरी : नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेळत असताना एका ३६ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली. मिलिंद वसंत भोंडवे असे त्या युवकाचे नाव असून तो दारूंबरे (ता. मावळ) येथे राहत होता.
पीडब्ल्यूडी मैदानावर गोलंदाजी करत असताना तो अचानक मैदानावर कोसळला. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह औंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र गावंडे यांनी दिली. मिलिंद भोंडवे हा तरुण शेतकरी कुटुंबातील होता. आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.