हरित सेतू प्रकल्पाला नागरिकांचा विरोध

निगडी : निगडी प्राधिकरण मध्ये हरित सेतू हा प्रकल्प चालू असून या प्रकल्पामुळे प्राधिकरण मध्ये भविष्यात येणाऱ्या समस्या अडचणी या विषयावर प्रकल्पाला विरोध व काही उपाययोजना सुचवण्यासाठी मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये अनेक समस्या वरती चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने 1) फुटपाथ मोठा केल्यास वाहतूक कोंडी होणार, 2) फुटपाथ वर टपरीधारक, हातगाड्या येणार, 3)सायकल ट्रॅक व वाहन पार्किंग बॉस्क मुळं होणारी वाहतूक कोंडी,4) फुटपाथवर बसण्यासाठी बाके बसवल्यामुळे अनैतिक प्रकार घडणार आहे 5) प्राधिकरण मध्ये नागरीभागान मध्ये सुद्धा हा प्रकल्प चालू होनार आहे त्यामुळे या भागातील लहान रस्ता व अन्य मुख्य मोठ्या रस्त्यावरती एकाच निर्णय कसा घेतला, हे व असे अनेक हरकती सुचवण्यात आल्या आहेत
हा प्रकल्प शहरातील अनेक भागातील रस्त्यावरती वेगवेगळ्या नावांनी राबविण्यात आला आहे त्यामध्ये अर्बन स्ट्रीट, स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते, हरित सेतू, आज अनेक भागात रस्त्यावरती वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, जगताप डेरी, वाकड, गुरु पिंपळे, सांगवी,नव्याने काम चालू असलेले दापोडी ते निगडी मुंबई पुणे रोडवरील महानगरपालिकेच्या समोर मोठी वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे या सर्व भागातील वाहतूक कोंडीचा विचार करता हा हरित सेतू प्रकल्प प्राधिकरण मध्ये नको असाच सूर सर्व नागरिकांनी व्यक्त केला. या प्रकल्प विषयी काही निर्णय घेण्यात आले आहेत त्यानुसार या प्रकल्पाच्या विरोधात प्राधिकरणवासीयांच्या सह्यांची मोहीम घेण्याचे नियोजन असून हे सह्यांचे पत्र व हरकती मागण्याचे निवेदन मा.आयुक्त साहेबांना,व संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचे आहे.
हेही वाचा – अग्नितांडव.! हैदराबादमधील चारमिनारजवळच्या आगीत १७ ठार
मा आयुक्त साहेबांनी आपल्या हरकती सूचना निवेदनावरती सकारात्मक तोडगा काढला नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांमध्ये जनजागृती करून न्यायालयामध्ये याचिका दाखल करणे, असे अनेक प्रकारेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले.
आजच्या या मीटिंगमध्ये प्राधिकरण मधील बरेच नागरिक, महिला,युवक उपस्थित होते.त्यामध्ये मा.महापौर आर एस कुमार,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक,पर्यावरण प्रेमी सूर्यकांत मुथियान, भाजपाचे बाळा शिंदे, अतुल इनामदार,राधिकाताई बोरलिकर, मनसेचे बाळा दानवले, ओंकार पाटोळे,राष्ट्रवादीचे निलेश शिंदे, स्वप्नपूर्ती सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र हिंगे, श्रीधर दैठणकर, शर्मिलाताई महाजन, हेमंत पटवर्धन, गणेश बोरा, श्री चिंतामणी गणपती ट्रस्टचे विलास पाटणे, जगन्नाथ वैद्य, शिवसेनेचे राजिव मेनन, संघाचे जयेश मोरे, रमेश सरदेसाई, सुशांत बुचके,जी ए ढोरे, अनिल मळेकर, अमित कांबळे, मिलिंद रचपुत, गणेश जाधव,अजय मोरे, भागवत नागपुरे, रुद्र बैरागी, ऋषिकेश कांबळे, अनेक सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा दानवले व शर्मिलाताई महाजन यांनी केले.