ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनैसर्गिक अत्याचार करून रिवॉल्वरने गोळी झाडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

प्रसिद्ध उद्योजक पिता पुत्रावर गुन्हा दाखल 

पिंपरी चिंचवड | पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने रिवॉल्वरने गोळी झाडली. तसेच तिचा छळ करण्यासाठी सासर्‍याने प्रोत्साहन दिले. याबाबत औंध परिसरातील प्रसिद्ध उद्योजक पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 मे 2019 ते 24 जून 2019 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर रिवॉल्वरने गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेवर अत्याचार करण्यासाठी सासर्‍याने पतीला प्रेरणा दिली. तसेच विवाहितेला काठीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button