अण्णाभाऊ कष्टकरी कामगारांचे वास्तव मांडले – काशिनाथ नखाते
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संवेदनशील स्वभावातून लेखन केले जिवंत काढतूस,मास्तर, फकीरा, वारणेचा वाघ अशा असंख्य साहित्यातून शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे कष्टकरी कामगारांचे प्रश्न मांडून त्यांना योग्य पटलावर आणून न्याय देण्याची भूमिका अण्णाभाऊंनी घेतली त्यांनी जे वास्तव मांडले त्यातील अनेक प्रश्न आजही समाजात भेडसावतात असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले .
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, असंघटित कामगार विभाग,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन कडून अभिवादन करण्यात आले .या वेळी चंद्रकांत कुंभार, माया कोकरे, अंजना रोडे,सलीम डांगे, विजय जाधव ,सुनील टोके , शकील शेख, ज्योती राठोड आदी उपस्थित होते.
नखाते पुढे म्हणाले की अण्णाभाऊंची शाहिरी काव्याची भूमीका हि परिवर्तनवादी होती. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळ हातावर ठरलेले आहे हे अण्णाभाऊंनी निक्षून सांगितले महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे, महाराष्ट्र हा परिवर्तन घडवू शकतो याचा विश्वास त्यांना होता आणि विशाल महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले शोषणमुक्त समाजाचा ध्यास त्यांनी घेतला त्यांच्या साहित्याचा कामगार चळवळीला त्याचबरोबर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना अधिक लाभ झालेला आहे