ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धांचा भव्य सोहळा!

तबला, पखावज, शास्त्रीय व अभंग गायनासाठी जागतिक कलाकारांना सुवर्णसंधी

पुणे | पिंपरी-चिंचवड शहरातील कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तबला सोलोवादन, पखावज सोलोवादन, शास्त्रीय गायन तसेच अभंग गायन या विविध प्रकारांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्पर्धांच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विशेषतः नवोदित आणि तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

हेही वाचा      :                  उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौरांचे निर्देश

सदर स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी लवकरच प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार असून, हा संवाद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा संतपीठ अध्यक्ष डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री. संदीप खोत (उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, संतपीठ चिखली) यांनी सांगितले की, या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल आणि शहराला जागतिक स्तरावर एक नवे स्थान प्राप्त होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button