breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीसीसीओईमध्ये अप्रेंटिसशिप भरती मेळाव्यात 93 कंपन्यांचा सहभाग

पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट  संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई), भारत सरकारचे बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीसीओई, निगडी, पुणे येथे अप्रेंटीसशीप भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 93 कंपन्यांचा सहभाग तर साडेसहा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

यावेळी बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे उपसंचालक एन. एन. वडोदे, केएसबी कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक राहुल माळी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर अप्रेंटिसशिपसाठी 789 विद्यार्थ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

हेही वाचा   –    ‘आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे’; स्वप्नील कुसाळे

या भरती मेळाव्यात केएसबी, कायनेटिक, ह्युंदाई, रॉस प्रोसेस, बेलराइज, थरमॅक्स, ब्ल्यू स्टार, एसकेएफ, पियाजिओ, बजाज फायनान्स, मुबिया ऑटोमोटिव्ह, सुमॅक्स, बीव्हीजी इंडीया, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यासारख्या 93 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार व कंपनीतर्फे दरमहा विद्यावेतन दिले जाते. तसेच अप्रेंटीसशीपचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतांश कंपन्या पूर्णवेळ कर्मचारी म्हणून पुढील नियुक्ती देतात असे डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button