Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

​ भोसरीतील एस.पी.जी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

​' जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने आणि लेझीमच्या तालाने परिसर दुमदुमला

​ पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) 

येथील एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल (SPG International Public School) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषा, पोवाडे आणि लेझीमच्या निनादाने संपूर्ण शाळा परिसर शिवमय आणि मराठीमय झाला होता.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज व वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या “जय भवानी! जय शिवाजी!” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
​विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली मने

​बालगटापासून ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता आणि मावळ्यांची हुबेहूब भूमिका साकारली होती. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका, स्फूर्तीदायक पोवाडे आणि भाषणे यांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः ढोल-ताशांच्या गजरात सादर करण्यात आलेल्या लेझीम पथकाने कार्यक्रमात मोठी रंगत आणली. मराठी दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करून मराठी भाषेचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा –  ‘विकसित महाराष्ट्र’साठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा

प्रमुख उपस्थिती

​या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. पांडुरंग नाना गवळी, मा. सुनीता माई गवळी, मा. स्वप्नील गवळी, मा. कोमल गवळी आणि मा. संकल्प गवळी उपस्थित होते. तसेच लेखा विभागातील एकता जाधव व निशा वाघमारे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

​ प्रशासकीय नियोजन

​हा कार्यक्रम मुख्याध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड, तैसीन मुलाणी व सुप्रिया मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पारंपारिक पद्धतीने शिवाजी महाराजांचा पाळणा गायन हा सोहळा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. सुंदर सजावट आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

​कार्यक्रमाची सांगता राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ने आणि आभार प्रदर्शनाने करण्यात आली. “शिवचरित्राच्या स्मरणाने आणि मराठी भाषेच्या अभिमानाने विद्यार्थी व पालकांमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण झाली आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button