Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहशहर अभियंता रामदास तांबे यांची पाणीपुरवठा विभागातून हकालपट्टी

  • कार्यकारी अभियंता प्रविण लडकतकडे सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. सतत वादग्रस्त राहणारे आणि ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारे तांबे यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाकडील कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचे कामकाज कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांच्याकडे अतिरिक्त पदभार देवून सोपविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे वादग्रस्त सहशहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी झटका दिला आहे. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयामुळे भ्रष्ट व ठेकेदार धार्जिणी अधिका-यांना चांगलीच चपराक बसणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पाणी पुरवठा विभागात ठाण मांडून तांबे यांनी बसताण बसविले होते. कोट्यावधी रुपयाची कामे काही ठेकेदारांना सोपविली जात होती. तसेच बिल्डरांना एनओसी प्रकरण, चोवीस तास अमृत योजना, भासा-आसखेड, आंद्रा प्रकल्प, पवना जलवाहिनी प्रकल्प याशिवाय पाणी पुरवठा देखभाल व पथचलन कामांमध्ये अनेक तक्रारी येवू लागल्या होत्या.

तसेच मागील दीड वर्षापासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करुन आर्थिक मलिदाचे कामे करण्यावर भर दिला होता. मात्र अमृत योजनेतून 24 तास पाणीपुरवठ्याची कामे देखील अजून प्रलंबित आहेत. त्यामुळे तांबे यांच्याविषयी नगरसेवकासह नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

दरम्यान, रामदास तांबे यांच्याकडून पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे तांबे यांच्याकडे पर्यावरण आणि जलनि;स्सारण विभागाचे कामकाज दिले आहे. तर पाणी पुरवठा विभागाचा पुर्ण कारभार जलशुध्दीकरण सेक्टर 23 चे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना बढती देवून अतिरिक्त सहशहर अभियंता पदाचा कारभार सोपविला आहे. तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button