मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन
शिक्षण विश्व: एस.बी. पाटील कॉलेज आर्किटेक्चर मधील उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनमध्ये नुकताच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुसुमाग्रज, शांत शेळके, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई यांच्या कवितांचे सादरीकरण केले. सिद्धी भगत, कादंबरी कुंभार, सुदर्शन तौर, ऋतुजा वारिंगे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच आर्किटेक्ट स्वप्नील सेठ यांनी मराठी भाषेतील शब्दांची व्याप्ती आणि त्यांचे अनोखेपण याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे मराठी साहित्याचे वाचन करून स्वरचित कविता, लेख, मनातील संकल्पना व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा असे प्राचार्य स्मिता सूर्यवंशी यांनी सांगितले. ग्रंथपाल पूनम सांगळे यांनी आयोजनात सहभाग घेतला होता.
पी•सीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.