Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भोसरीमध्ये गुरुवारी रक्तदान शिबिर
पिंपरी | प्रतिनिधी
संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व संत निरंकारी सत्संग भवनतर्फे भोसरी येथे गुरुवारी (दि.24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिघी रोड येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत हे शिबिर घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या काळात प्रशासनातर्फे अनेक गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यामुळे शहरात होणार्या रक्तदान शिबिरांचे आयोजन होऊ न शकल्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत आहे. यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संत निरंकारी मिशनचे भोसरी प्रमुख अंगद जाधव यांनी दिली.