Breaking-newsपिंपरी / चिंचवड
‘पीएमपी’चे तिकीट पाच रुपये करा, मनसेची मागणी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेचे तिकीट पाच रुपये करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी केली. त्यासाठी ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. ‘स्वस्त बस प्रवास, हा आमचा हक्क’, ‘सर्व मार्गांसाठी पाच रुपये तिकीट करा’, आदी घोषणा या वेळी देण्यात आल्या.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण याचा विचार करता खासगी वाहनांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवासी वाढीसाठी तिकीटदरात कपात करावी, असे मनसेच्या शिष्टमंडळाने ‘पीएमपी’च्या अध्यक्ष नयना गुंडे यांना सांगितले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, जयराज लांडगे, प्रल्हाद गवळी, प्रशांत मते, आशिष देवधर, राहुल गवळी, अभिषेक थिटे, गणेश भोकरे आदी या वेळी उपस्थित होते.