एसटी महामंडळाची 105 विश्रामगृहे अत्याधुनिक होणार – मंत्री दिवाकर रावते

- वल्लभनगर आगारातील विश्रामगृहाचे नुतणीकरण
- मंत्री रावते यांच्या हस्ते विश्रामगृहाचे उद्घाटन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्यभरातल्या एसटी बस स्थानकातील 250 विश्रामगृहे बंद आहेत. त्यातील 105 नुतणीकरण करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा निर्णय कालच घेतला आहे. त्यामुळे जसे वल्लभनगर आगारातील विश्रामगृहाचे नुतणीकरण झाले. त्यापेक्षा अत्याधुनिक दर्जाची विश्रामगृहे करण्याचा निर्धार केला आहे. नुतणीकरणानंतर चालक-वाहकांना शेकडो मैल अंतर कापून आल्यानंतर आराम करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितली.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने वल्लभनगर आगारातील वाहक आणि चालक यांच्या विश्रामगृहाचे नुतणीकरण केले आहे. त्याचे उद्घाटन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज गुरूवारी (दि. 24) करण्यात आले. यावेळी रोटरी डिस्ट्रीक 3131 चे प्रांतपाल रो. डॉ. शैलेष पालकर, अध्यक्ष रो. सदाशिव काळे, प्रवर्तक रो. अनिल नेवाळे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे आदी यावेळी उपस्थित होत्या.
रावते म्हणाले की, वल्लभनगर आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहाचे नुतणीकरण झाले ही चांगली बाब आहे. परंतु, माझ्या संकल्पनेतलं काम झालेलं नाही. चालक-वाहकांना विश्रांतीसाठी दिलेल्या बेड्सवर गाद्यांची व्यवस्था नाही. केवळ जाड फळ्या टाकल्या आहेत. फळीवर झोपणे म्हणजे जमीनिवर झोपल्यासारखेच आहे. थोड्याशा कटकसरीमुळे रोटरीने केलेल्या कमावर पाणी फेरले आहे. या कामाच्या खर्चात रोटरीचा 7 टक्के तर एसटी महामंडळाचा 40 टक्के वाटा आहे. त्यामुळे रोटरीने स्वतःची टिमकी वाजवून घेऊ नये. यात महामंडळाचे अधिक योगदान आहे, असेही रावते म्हणाले.
रोटरीयन्सना सुनावले खडेबोल
नुतणीकरण केलेल्या विश्रामगृहाची पाहणी करताना मंत्री रावते यांनी बेडवर गाद्या का टाकल्या नाहीत, अशी विचारणा केल्यानंतर पूर्वीच्या स्पंचच्या गाद्या कर्मचारी घेऊन गेले आहेत. असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यावरून रावते यांनी आगारातील अधिकारी आणि रोटरीच्या पदाधिका-यांना खडसावले. कर्मचारी गाद्या घरी घेऊन जातात, अशी उत्तरे देणे आपल्याला शोभते काय, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
मंत्री रावते यांच्या संकल्पनेतले बेड्स
विश्रांतीसाठी बेड्स दिल्यानंतर त्यावर उत्तम दर्जाची गादी अपेक्षीत आहे. त्याचठिकाणी मोबाईल चार्जींग करण्यासाठी विद्युत पॉईंटची व्यवस्था करणे गरजेचे आहे. बेडलाच कर्मचा-यांची कपडे सुकविण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असणे अपेक्षीत आहे. त्यांचे मनोरंजन होण्यासाठी टिव्हीची व्यवस्था केली असली तरी समोर बसण्याची व्यवस्था उत्तम दर्जाची हवी. त्याठिकाणी वातानुकुलीत हॉल असणे गरजेचे आहे. स्वच्छता गृहे उच्च दर्जाची असावीत, अशाही सूचना मंत्री रावते यांनी रोटरियन्सना केल्या आहेत.