breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली

  • लेखी परीक्षेची नवीन तारीख 19 नोव्हेंबर

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली असून लेखी परीक्षेचा चौथा मुहूर्त काढण्यात आला आहे. पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा थेट दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षेची तारीख पुढे आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी प्रथम 3 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आली. त्यात बदल करून 17 ऑक्टोबर ही दुसरी तारीख जाहीर करण्यात आली. त्यातही बदल करून पुन्हा 23 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार असल्याचे तिस-यांदा जाहीर करण्यात आले. आता त्यातही बदल करण्यात आला असून ही परीक्षा आणखी पुढे ढकलली आहे. 19 नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तीन टप्प्यात भरले जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील भरती 2019 मध्ये जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 720 पदांसाठी एक लाख 89 हजार 732 जणांचे अर्ज आले. मात्र गेल्या वर्षी कोरोना साथ आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे ही प्रक्रिया रखडली. दरम्यान, राज्यातील इतर शहर व ग्रामीण पोलीस दलांकडून परीक्षा घेण्यात आली. मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची लेखी परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते.

परीक्षार्थी उमेदवार लेखी परीक्षेपूर्वी किमान एक दिवस अगोदर शहरात येतात. तिथे प्रवास, राहणे, खाणे व इतर तयारी करतात. पण वारंवार तारखा बदलत असल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले आहेत. लेखी परीक्षेचे नियोजन त्रयस्थ संस्थेला देण्यात आले आहे. त्या संस्थेकडून याबाबत संपूर्ण तयारी केली जात आहे. मात्र या संस्थेची तयारी अजूनही पूर्ण न झाल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलली जात आहे.

अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे म्हणाले, “परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन केले जात आहे. परीक्षार्थींना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. त्याचे परीपूर्ण नियोजन करता यावे म्हणून संबंधित व्हेंडर कंपनीने वेळ वाढवून मागितली आहे. त्यानुसार 19 नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.”

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई पदाच्या कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा –

सर्वसाधारण – 176
महिला – 216
खेळाडू – 38
प्रकल्पग्रस्त – 38
भूकंपग्रस्त – 14
माजी सैनिक – 107
अंशकालीन पदवीधर – 71
पोलीस पाल्य – 22
गृहरक्षक दल – 38

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button