breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘लाजवा’ मुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत ‘वनवा’

नव्या समीकरणांची चर्चा : राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना गर्भीत इशारा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण गावकी-भावकी, भाऊबंदकीच्या अवतीभोवती सुरू होते आणि संपते. आगामी ५० वर्षे तरी हीच परिस्थित पहायला मिळेल. मग, कुठली लाट, वादळ आणि त्सुनामी आली तरी, इथल्या राजकारणात निर्णायक राहतील ते भूमिपुत्रच. बेस्ट सिटी, आयटी हब आणि स्मार्ट सिटी अशी प्रगतीशील वाटचाल करणाऱ्या शहरात राजकीय वर्चस्ववाद असला, तरी पक्षभेद विसरुन नाती जपणारे जीवंत हृदयाचे नेते आहेत. हेच इथल्या मातीचे वैभव आहे. याचा प्रत्यय देणारा प्रसंग नुकताच घडला.
शहराच्या राजकारणातील एकेकाळचे मातब्बर नेते किंबहुना ‘पिंपरी-चिंचवडचे शरद पवार’ अशी ज्यांची ओळख आहे ते भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, दुसरे राजकीय पटलावरील ‘भाऊबली’ अर्थात चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप आणि तिसरे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील… असा या तीन मातब्बर नेत्यांचा २००२ पासूनचा ‘लाजवा’ ग्रुप. शहराच्या राजकारात उलथापलथ करण्याची क्षमता असलेला किंबहूना सुमारे २० वर्षे शहरावर वर्चस्व गाजवणारा हा राजकीय दबावगट.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना या सर्वांना सीनिअर असलेले विलास लांडे यांची प्रकृती आजही ठणठणीत आहेत. त्यानंतर सुमारे ५० दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेवूनसुद्धा स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आणि तत्पूर्वी राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी जीवाची पर्वा न करता मुंबईला रवाना झालेले लक्ष्मण जगताप यांनी आजारपणावर यशस्वी मात केली. नगरसेवक, महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असा राजकीय प्रवास करणारे संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीला पडत्या काळात अक्षरश: संजीवनी दिली. या तिघांची भेट जगताप यांच्या चंद्ररंगवर झाली. त्याचा पहिला फोटो वाघेरे-पाटलांनी आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात झाली.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपूर्वी जगताप यांच्यापासून राजकीयदृष्टया दुरावलेले माजी नगरसेवक नवनाथ जगताप आणि प्रशांत शितोळे हेसुद्धा पहायला मिळाले. त्यामुळे शहर राष्ट्रवादीत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मिल बैठें तीन यार…तो राजकारण आरपार…
दरम्यान , आमदार जगताप यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली असून, लांडे आणि वाघेरे भेटायला आल्यावर गप्पांचा फड रंगला. आपल्या स्वभावानुसार, लांडे यांना टोला हाणला. तिथे कोण आणि किती प्रामाणिक राहिले आहेत, असा उपरोधिक टोला लगावला. तसेच, लांडे यांना पक्षात साईडलाईन केले जात आहे, याबाबत खंतही व्यक्त केली. दुसरीकडे, संजोग वाघेरे यांच्याबाबतीतही तिच स्थिती आहे. प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप ही मंडळी भाजपावर नाराज असे चित्र होते. मात्र, जगताप यांच्यासोबतचा त्यांचा फोटो वेगळ्या राजकीय भूमिकेचे संकेत देत आहेत. याहून जगताप यांनी लांडे आणि वाघेरे यांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला ‘तो’ फोटो राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या काळजात धस्स करणारा आहे. राष्ट्रवादीकडून साईडलाईन केले ज्येष्ठ आणि आजी-माजी नेते आता भाजपाच्या गळाला लागणार तर नाही ना? असा राजकीय चर्चेचा सूर बदललेला पहायला मिळत आहे.

‘‘आमदार जगताप गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. २००२ मध्ये लांडे, जगताप आणि आम्ही महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून काम करीत होतो. त्यावेळी ‘लाजवा ग्रुप’ म्हणून आम्हाला ओळखले जायचे. ही दोस्ती आजची नाही. आम्ही नातेवाईकसुद्धा आहोत. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला गेलो असता आम्ही जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याचे ठरवले. त्यानुसार केवळ कौटुंबिक भेट घेण्यासाठी गेलो होतो. यातून कसलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
– संजोग वाघेरे- पाटील, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button