breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक राजेश पाटील यांचा भाजपाला ‘झटका’

पिंपरी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने विविध ५८९ कामांच्या एकूण १ हजार ५८ कोटींच्या तरतुदीतील निधीत चढ व घट करत सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पास दिलेल्या उपसूचना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी फेटाळून लावत भाजपला एकप्रकारे झटका दिला आहे. चार हजार ९६१ कोटी ६५ लाखांचा आणि केंद्र व राज्य शासनाचा निधी धरून एकूण ६ हजार ४९७ कोटी २ लाखांचा मूळ अर्थसंकल्पास मंगळवारी (दि.२९) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शुक्रवार (दि.१) पासून आयुक्तांची अर्थसंकल्पावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मधुकरराव पवळे सभागृहात सभेस नगरसचिव तथा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समिती सभेसमोर १८ फेब्रुवारीला सादर केला होता.

स्थायी समितीच्या २३ फेब्रुवारीला झालेल्या विशेष सभेत अर्थसंकल्पाच्या निधीत कोणतीही वाढ न करता विविध कामांत घट व वाढ सुचविण्यात आली होती. विविध लहान व मोठ्या अशा एकूण ५८९ कामांच्या एकूण १ हजार ५८ कोटींची चढ व घट करण्यात आली. उपसूचनेद्वारे अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, महापालिकेची फेब्रुवारी २०१७ ची पंचवार्षिकीची मुदत १३ मार्चला संपल्याने त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली नव्हती. प्रशासक राजवटीत स्थायी समितीच्या उपसूचना आयुक्त स्वीकारणार की फेटाळणार यांची उत्सुकता लागली होती. अखेर, आयुक्तांनी स्थायीच्या सर्व उपसूचना न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तयार केलेला मूळ अर्थसंकल्पास त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून आयुक्तांचा अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

आयुक्त राजेश पाटील यांचा भाजपला झटका

स्थायी समितीने अर्थसंकल्पास भरमसाट उपसूचना दिल्या होत्या. सत्ताधारी भाजपने आपल्या सोयीनुसार प्रभागानुसार वर्गीकरणाचे असंख्य प्रस्ताव दिले होते. नवी कामे, उपसूचना व निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव आयुक्त राजेश पाटील स्वीकारणार की कात्री लावणार याची उत्सुकता लागली होती. ग्राह्य व अग्राह यादी करून त्यातील ग्राह्य कामे स्वीकारणार असे, आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता सर्वच उपसूचना फेटाळून त्यांनी भाजपला मोठा झटका दिल्याचे स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button