breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चाचा पर्यावरण संवर्धनाचा ‘संकल्प’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी दिघीगाव येथे वृक्षारोपण

भाजयुमो भोसरी- चऱ्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला आहे. त्यानिमित्त दिघी गाव येथे भोसरी-चऱ्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा, अविरत श्रमदान संस्थेतर्फे वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला. दिघी गाव येथील दत्तगडाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, दिगंबर जोशी, सुनील कदम, मनीष सासवडे, सिद्धू आवसर, मोहन कदम, मनीष राऊत, धनाजी पाटील, आबा माळी, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, सुशांत गाडे,अमित महाडिक,पंकज शर्मा प्रमोद पठारे अतुल राक्षे,प्रदीप तापकीर आदी उपस्थित होते.
उदय गायकवाड म्हणाले की, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त् भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग ४ क्रमांक दिघी, बोपखेल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिघीगाव येथील दत्तगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. जांभूळ, आंबा, पांगारा, शिवण, चिंच, बदाम, सावर, आवळा, फणस, धावड या प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button