TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाची छायाचित्रे लावावीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे थेट पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाची छायाचित्रे लावण्याची मागणी केली आहे. खरं तर केजरीवाल यांनी काल पंतप्रधानांना देवांची प्रतिमा असलेल्या नवीन नोटा जारी करण्याची विनंती केली होती आणि त्यासंदर्भात आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना औपचारिकपणे पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र केजरीवालांना आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे. ट्विटमध्ये या पत्राची माहिती देताना केजरीवाल यांनी लिहिले की, मी पंतप्रधानांना पत्र लिहून 130 कोटी भारतीयांच्या वतीने भारतीय चलनावर महात्मा गांधीजी आणि लक्ष्मी, गणेशजींचा फोटो लावण्याची विनंती करीत आहे. अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेत मी केलेल्या जनतेच्या मागणीला प्रचंड पाठिंबा मिळाला. लोकांमध्ये याबद्दल खूप उत्सुकता आहे, ती लवकरात लवकर लागू व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.”

गुरुवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख म्हणाले होते की, लक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि भगवान गणेश अडथळे दूर करतात. सर्व नोटा बदलल्या पाहिजेत, असे माझे म्हणणे नाही. परंतु दर महिन्याला जारी करण्यात आलेल्या सर्व नवीन नोटांवर त्यांची प्रतिमा असावी. त्यांनी इंडोनेशियातील मुस्लिम राष्ट्राचा उल्लेख केला होता, ज्यांच्या नोटेवर गणेशाचे चित्र आहे. केजरीवाल म्हणाले होते, “जर इंडोनेशिया करू शकतो, आम्ही का नाही?” इंडोनेशियात 20,000 रुपयांच्या नोटेवर गणपतीचे चित्र छापण्यात आले आहे. भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि लक्ष्मीच्या प्रतिमा छापण्याच्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला भारतीय जनता पक्षाने “राजकीय नौटंकी” म्हणून संबोधले आहे. येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केजरीवाल असे वक्तव्य करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button