breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल आणखी सात रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली – ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पेट्रोल डिझेल आणखी ७ रुपयांनी स्वस्त करण्याचे संकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले आहेत. याबाबत राज्यांनी पेट्रोल डिझेल वरचे कर कमी करावेत यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कराड यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत असल्याने लोकांमध्ये असंतोष होता. जून २०२० पासून पेट्रोल डिझेलवर दरवाढ सुरू आहे. सरकारने पेट्रोल डिझेलवरचे नियंत्रण उठवल्याने ऑईल कंपन्या कच्चा तेलाच्या वाढलेल्या किमतीनुसर पेट्रोल डिझेलवरील दर वाढवत होते. त्यामुळे लोक नाराज होते आणि याच नाराजीचा फटका भाजपला पोट निवडणुकीत बसला. त्यामुळे आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पक्षाचे आणखी नुकसान होऊ नये, म्हणून बुधवारी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचे काही कर कमी केले. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर आणखी १७ राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील राज्याच्या करात कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्याच्या पेट्रोल डिझेलवरील कपात करावी. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यास राज्य सरकारचा नकार

केंद्राने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करून पेट्रोल डिझेल स्वस्त केले असले तरी राज्य सरकारने मात्र पेट्रोल डिझेलवरील राज्याचे कर कमी करण्यास नकार दिला आहे. राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्याचे कारण पुढे करून राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार यांनी कर कमी करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button