breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

पेट्रोल, डिझेलच्या किंमती पुन्हा भडकल्या! जाणून घ्या आजचे दर

 

मुंबई – एकीकडे संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना महागाईचादेखील फटका बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील दोन दिवस स्थिर होत्या. मात्र आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा एकदा वाढल्या आहेत. आज (शुक्रवार) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १७ ते १९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९३.३४ रुपये इतकी झाली असून डिझेल प्रतिलिटर ८३.८० रुपये इतके झाला आहे. तसेच मुंबईत पेट्रोल ९९.३४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९१.०१ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. परंतु निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. देशातील बर्‍याच राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किंमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि कालच्या वाढीसह मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.

दरम्यान, देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button