breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपा नेते, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधुच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

पिंपरी | प्रतिनिधी

भाजपा नेते आणि चिंचवड विधानसभा मतदार संघचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे . ही घटना मंगळवारी ( दि . 23 ) दुपारी पिंपळे
पिंपरी(वास्तव संघर्ष) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे . ही घटना मंगळवारी ( दि . 23 ) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत . पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे . मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून तिघेजण आले . त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले. त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला . सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button