ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाच पांडव मंदिराच्या जीर्णोद्धारास चंद्रसेनराजे व सत्यशीलराजे यांची अनुमती

पिंपरी चिंचवड | तळेगाव दाभाडे येथील प्राचीन पाच पांडव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दिवंगत श्रीमंत सरदार विजयसिंहराजे यशवंतराव दाभाडे यांचे वंशज सरदार चंद्रसेनराजे दाभाडे व सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी अनुमती दिली आहे.या संदर्भात सरदार चंद्रसेनराजे दाभाडे व सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तळेगाव दाभाडे येथील पाच पांडव मंदिर हे महाराष्ट्रातील पांडवांचे एकमेव प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर दाभाडे राजघराण्याच्या सामायिक मालकीचे आहे. त्यात सरदार चंद्रसेनराजे दाभाडे व सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांचाही मालकी हक्क आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

हे मंदिर अतिशय जीर्ण झाले असून त्याच्या भिंती पडून इतरांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा जीवितहानी होण्याची भीती स्थानिक लोकांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. शहरातील काही नागरिकांना या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा आहे. आम्ही आमच्या वतीने परवानगी देण्यास तयार आहोत. मंदिर जीर्णोद्धार करणाऱ्यांना आमची सहमती आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तरीही काही कारणास्तव तिथे वास्तूस इजा किंवा आजूबाजूच्या लोकवस्तीला त्यामुळे काही नुकसान पोहचले तर त्याची जबाबदारी कै. विजयसिंहराजे यशवंतराव दाभाडे यांच्या वंशावर राहणार नाही, याची दखल घ्यावी, असेही त्यांनी निवेदनाच्या शेवटी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button