breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट महाराजांना दिली, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केलं आहे. शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर कसलंही भाष्य करणार नसल्याचं ते म्हणाले. मात्र, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट दिल्याचा आरोप त्यांनी केला. संभाजीराजेंच्या नेतृत्त्वासंदर्भात भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करुन राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील अप्रत्यक्षपणे बोट दाखवलं आहे. संभाजीराजे मला भेटण्यापूर्वीच त्यांनी राज्यसभा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला होता, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा मोठा मान आहे. त्यांनी कुठलही मत व्यक्त केलं असलं तरी मी बोलणार नाही. संभाजीराजेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती बोलकी आहे. संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवाजी महाराजांना स्मरुन जे बोललो ते खरं आहे, असं सांगितलं. संभाजीराजेंची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली आहे. चुकीची माहिती देणाऱ्या लोकांना ते संभाजीराजेंना चुकीचं ठरवत आहेत. महाराज आणि युवराज यांच्यात अंतर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मला दु: ख आहे.

संभाजीराजे यांचं नेतृत्त्व गेल्या सहा वर्षात तयार झालं आहे. मराठा समाजात आणि बहूजन समाजात संभाजीराजे यांचं नेतृत्त्व तयार झालं,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजात आणि बहूजन समाजात असं नेतृत्त्व तयार झाल्यानंतर त्याचं नुकसान भाजपला होणार नाही. याचं नुकसान कुणाला होणार हे राजकारण कळणाऱ्या प्रत्येकाला कळतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी मला भेटण्यापूर्वी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. संभाजीराजे यांनी भेटीदरम्यान देखील राज्यसभा अपक्ष लढवणार असल्याचं म्हटलं होतं. सर्व पक्ष उमेदवारीला पाठिंबा दिल्यास मी पक्षश्रेष्ठींशी बोलेन, कारण आमचा निर्णय आमच्या हातात नाही,असं त्यांना सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button