पिंपरी / चिंचवड

संभाजीनगर येथे पादचारी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावला

पिंपरी l प्रतिनिधी

संभाजीनगर, चिंचवड येथे पादचारी तरुणाचा मोबाईल फोन तीन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री पावणे नऊ वाजता घडली.

ओंकार विवेक लोकळूचे (वय 22, रा. संभाजीनगर, चिंचवड. मूळ रा. कर्नाटक) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी संभाजीनगर येथून पायी चालत जात होते. त्यावेळी एका पल्सर दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button