breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

PDCC Election | माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांनी मारली बाजी

पुणे । प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी येत्या आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यात सुरू आहे. या सात जागांसाठी १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. पुणे शहरातील लष्कर परिसरातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी पार पडत आहे.

पुण्यात पार पडत असलेल्या मतमोजणीत आमदार अशोक पवार, विकास दांगट, सुनील चांदेरे PDCC बँक निवडणुकीत विजयी झाले आहेत.पुणे जिल्हा बँकेवर तालुका मतदारसंघात पवार, दांगट, चांदेरे यांनी बाजी मारली आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष म्हस्के, कलाटे यांना पराभवाचा धक्का बसल्याचा निकाल समोर आला आहे. त्यामुळे यंदा नव्या चेहऱ्यांना मतदारांची पसंती दिल्याचं दिसतंय.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी माजी मारली आहे.

बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे.
हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button