breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC Standing Cummite Election : भाजपाचे निष्ठावंत शितल शिंदेचा ‘गेम’ का झाला? देवेंद्र फडणवीस यांनीही ‘शब्द’ फिरवला!

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे निष्ठावंत नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांना स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत डावलण्यात आले. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेला ‘शब्द’ फिरवला आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांची हतबलता पुन्हा एकदा चव्‍हाट्यावर आली आहे.

        स्थायी समिती सभापती पदासाठी एक-एक वर्ष संधी देण्याचे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने ठेवले आहे. मात्र, सुरुवातीची तीन वर्षे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सल्ल्यानुसार, सीमा सावळे, ममता गायकवाड आणि विलास मडिगेरी यांना संधी दिली. त्यानंतर उर्वरित दोन वर्षे आमदार महेश लांडगे गटातील नगरसेवकाला स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी देण्याचे ठरवण्यात आले. मात्र, निष्ठावंत गटाकडून शितल शिंदे यांनी दोनदा स्थायी समिती सभापतीपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली. मात्र, दोनदा त्यांना डावलण्यात आले. गतवर्षी दस्तुरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘शब्द’ दिला होता की, पुढच्या वर्षी तुम्हाला संधी देवू…पण, यावर्षी शहर भाजपामध्ये संघटनात्मक बदल झाले. संघटनेची सूत्रे आमदार महेश लांडगे यांच्याकडे आली. त्यानंतर अखेरच्या क्षणापर्यंत स्थायी समिती सभापतीपदसाठी चर्चेत असलेल्या शितल शिंदेंना यावेळीही माघार घ्यावी लागली. त्यामुळे शहर भाजपामध्ये सर्व अलबेल नाही, असेच स्पष्ट होत आहे.

स्थायी सदस्यपदाचा राजीनामा देणार नाही : शितल शिंदे

दरम्यान, स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा आपण देणार नाही, अशी भूमिका शितल शिंदे यांनी घेतली आहे. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या चार सदस्यांना राजीनामा देण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. मात्र, स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरुन मी कदापिही सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाही. मला वरिष्ठ पातळीवर चर्चा करायची आहे. मला ‘शब्द’ दिला होता. तो का फिरवला…याबाबत मी प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडणार आहे, अशी भूमिका नगरसेवक शितल शिंदे यांनी घेतली आहे.

काय आहेत कारणे शितल शिंदेंना डावलण्याची?

शितल शिंदे यांनी गतवेळी पक्षाच्या भूमिकेविरोधात स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे सूचक होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांची अनुमोदक म्हणून स्वाक्षरी होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यामुळे शितल शिंदे यांनी ऐनवेळी माघार घेतली.

        दरम्यान, ‘चुकीला माफी नाही’ असे राजकारण करणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप यांना शितल शिंदे इच्छुक होते. ही बाब कदापिही खटकली नसावी. पण, त्यांच्या अर्जावर राहुल कलाटे यांची सूचक म्हणून स्वाक्षरी होती. ही बाब जगताप यांना खटकली असावी. कारण, राहुल कलाटे आणि जगताप यांच्या चिंचवड विधानसभेचा सत्ता संघर्ष सर्वज्ञात आहे. वास्तविक, शितल शिंदेंना फॉर्म भरण्याची सूचना लक्ष्मण जगताप यांनीच दिली होती. हेही ततकेच सत्य आहे.

  •  शितल शिंदेंना स्थानिक ‘गॉडफादर’ नाही:

भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शितल शिंदे यांचा संपर्क प्रदेशपातळीवर दांडगा आहे. ॲड. सचिन पटवर्धन यांच्याप्रमाणे शिंदे यांची ‘फिल्डिंग’ थेट आहे. विशेष म्हणजे, शितल शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात सलोखा आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान दोन्ही आमदार म्हणजे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना शितल शिंदेंचे राजकीय वजन वाढू द्यायचे नाही. शितल शिंदे स्थायी समितीवर अध्यक्ष झाल्यास २०२४ मध्ये चिंचवड विधानसभेची भाजपाचे उमदेवार होवू शकतात. तसेच, महापालिका कामातील अनुभव असल्यामुळे दोन्ही आमदारांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळेच दोन्ही आमदारांनी समझोता केला असावा, असा राजकीय कयास आहे.

  •  महेश लांडगेंनी कसलाही ‘शब्द’ दिला नाही :

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शितल शिंदेंची समजूत घातली असून, आगामी वर्षी संधी देणार असल्याचे बोलले जाते. मात्र, लांडगे यांनी कसलाही ‘शब्द’ दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला ‘शब्द’ फिरवला आहे. मग, स्थानिक पातळीवर बाबच निराळी आहे. दोन्ही आमदारांनी शितल शिंदे वरपर्यंत पोहचू नयेत याची पद्धतशीर काळजी घेतली, असेच चित्र निर्माण झाले आहे.

बातम्या:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button