ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभियंत्यांच्या नवसंकल्पनांना पीसीईटी नेहमीच पाठबळ देते : ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी बनविले स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन
पिंपरी | नविन अभियंत्यांनी वैयक्तिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, वीज, पाणी, दळणवळण यासाठी कमीतकमी खर्चात नवसंकल्पना मांडून संशोधन करावे यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) नेहमीच पाठबळ देत आहे. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी सेन्टर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजसच्या (CIIL) सहयोगाने बनविलेल्या स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचा उपयोग शहरी तसेच ग्रामिण भागातील महिलांना होईल. या संशोधन प्रकल्पाचे व्यवसायिक मॉडेल उभारण्यासाठी पीसीईटी मार्गदर्शन करेल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) जयेश कोल्हे, गुरुप्रसाद देशपांडे, विशाल खंडागळे या विद्यार्थ्यांनी डॉ. रजनी पी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णतः स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची निर्मिती केली आहे. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आदींनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची माहिती देताना डॉ. रजनी म्हणाल्या की, हे मशिन हाताळण्यास अगदी सोपे आहे. यामध्ये 20 आणि 50 पॅड साठवण क्षमता असणारे दोन मॉडेल्स्‌ प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आले आहेत.
हे मशिन विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल, महाविद्यालये, मंडई, सिनेमागृह, नाट्यगृह आदी ठिकाणी लावता येतील. या मशिनमध्ये विशिष्ट रकमेचे नाणे टाकताच त्यातून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होईल. युवती व महिलांनी सॅनिटरी पॅडचा वापर करावा त्यामुळे सार्वजनिक आरोग्यात निश्चितच सुधारणा होईल असेही डॉ. रजनी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button