breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

थकीत वीज बिल भरा आणि ई-स्कूटर, मोबाइल, फ्रिज जिंका; महावितरणचा भन्नाट उपक्रम

औरंगाबादः मराठवाड्यात थकीत वीजबिलाचा डोंगर वाढल्याने अखेर महावितरणने ग्राहकांना बिल भरण्यासाठी आकृष्ट करीत बक्षिसांची योजना जाहीर केली आहे. पाच महिन्यांत वेगवेगळ्या मोहिमा राबवूनही अपेक्षित थकीत वीजबिल वसुली झाली नसल्याने ग्राहकांसाठी बक्षिसांची अफलातून योजना महावितरणने आणली आहे. मात्र, पावसाळ्यात वीज वापर कमी असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकता आहे.

महावितरण घरगुती वीज ग्राहकांना दरमहा वीज बिल पाठवत आहे. काही ग्राहक नियमित बिले भरतात. मात्र अनेक ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. मराठवाड्यात थकीत वीजबिलांचा डोंगर वाढत आहे. घरगुती ग्राहकांनी नियमित वीजबिल भरल्यास थकबाकी कमी होऊन महावितरणवर ताण कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने देय दिनांकापूर्वी थकबाकीसह चालू वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉटरी पध्दतीने निवड केलेल्या ग्राहकांना बक्षिसे मिळणार आहेत. मागील पाच महिन्यात महावितरणने ‘हर घर दस्तक’सारख्या योजना राबवूनही वीजबिल भरण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना वीजबिल वसुलीचे लक्ष्य देऊनही भरणा वाढत नसल्याने महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांसाठी बक्षीस योजना राबविली आहे. राज्यातील वीज टंचाईमुळे महावितरण विविध वीज निर्मिती कंपन्यांकडून महागड्या दराने वीज खरेदी करीत आहे. ग्राहकांना कमी दरात वीज वितरीत केली जाते. दरमहा नियमित बिले भरणा कमी असल्याने थकबाकी वाढत आहे. बिले भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडे पाठपुरावा करावा लागतो. ग्राहकांना वीज बिले भरण्याची सवय लावण्यासाठी जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत मराठवाड्यात महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून लाखो रूपयांची बक्षिसे देणार आहेत. किमान बक्षिसांमुळे बिलांचा भरणा वाढेल, अशी महावितरणला अपेक्षा आहे.

चालू बिलासह थकबाकी ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरण्यासाठी तीन महिने बंपर लॉटरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार नाही. दर महिन्याच्या १० तारखेला लॉटरी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यात वीज वापर कमी असल्यामुळे ग्राहकांचा स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता वाढली आहे.

  • ग्राहकांसाठी बक्षिसे

प्रादेशिक कार्यालयात स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर

तीन परिमंडळातून प्रत्येकी एक एलइडी टीव्ही

प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून दरमहा एक रेफ्रिजरेटर

दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर

नऊ मंडळातून – प्रत्येकी एक मोबाइल किंवा टॅब्लेट

दरमहा मराठवाड्यातील १०१ उपविभागातून एक हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी दोन बक्षिसे वस्तू स्वरूपात

महावितरणचे थकीत वीज बिल मुदतीपूर्वी चालू बिलासह भरणाऱ्यांनी बंपर लॉटरी स्पर्धेत सहभागी व्हावे. थकीत बिलांचा भरणा वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणारी ही योजना आहे.

डॉ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button