breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनोबल वाढवण्यासाठी महापालिकेच्या फेसबुक पेजद्वारे रुग्णांना मिळणार योगप्रशिक्षण

पिंपरी / महाईन्यूज

कोविडची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण तसेच गृह विलगीकरण केलेल्या रुग्ण आणि नागरिकांसाठी मनोबल वाढविणे व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज योगप्रशिक्षण घेण्यात येणार आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने Covid-19 रुग्णांसाठी सुरु करण्यात येणा-या निशुल्क ऑनलाईन योग प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रमाचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसदस्या आरती चौंधे, निर्मला कुटे, पतंजली योगपीठ, हरिद्वार येथून ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ. जयदीप जी आर्य, महाराष्ट्र प्रभारी बापू पाडळकर, जिल्हा अध्यक्ष मिलिंद वालझाडे, संघटन मंत्री डॉ. नारायण हुले, भोसरी विभागप्रमुख सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.

योगासनांमुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते तसेच प्राणायामामुळे ऑक्सिजन क्षमता वाढते. त्यातून रुग्णाला उर्जा मिळून तो लवकर बरा होतो असे डॉ. जयदीप जी आर्य म्हणाले. तणाव मुक्तीसाठी देखील योगसाधना महत्वाची ठरते असे नमूद करून ते म्हणाले, शहरातील गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधितांना योग मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे योगप्रशिक्षक सहकार्य करतील. कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी योगासन महत्वाचे असून त्यासाठी महानगरपालिका पतंजली योगपीठा समवेत हा उपक्रम सुरु करीत आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत तज्ञ योगशिक्षकांतर्फे योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या.

पतंजली योगपीठाचे स्वामी रामदेवजी महाराज यांनी योगाभ्यासाचा प्रोटोकॉल तयार करुन टेली-मेडिसिन या योजनेअंतर्गत रुग्णांचे मनोबल वाढविणे व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग व आयुर्वेदाचा उपयोग कसा रावा यावर मार्गदर्शन केले आहे असे बापू पाडळकर यांनी सांगतिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button