पिंपरी / चिंचवड

प्रवाशांनी हत्यारांचा धाक दाखवत टेम्पो चालकाला लुटले

पिंपरी l  प्रतिनिधी

प्रवासी म्हणून टेम्पोमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांनी टेम्पो चालकाला हत्याराचा धाक दाखवून लुटले. टेम्पो चालकाकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 6) पहाटे मुंबई-पुणे महामार्गावर पुनावळे अंडरपास ब्रिजवर घडली.

वैभव गणेश लबडे (वय 28), सागर संजय अडागळे (वय 23), दिनेश सुमंतराव गोगावले (वय 34, रा. हडपसर, पुणे) अशी अटक  आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी युवराज लेसु राठोड (वय 28, रा. कृष्णानगर, उंब्रज, ता. कराड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक आहेत. ते त्यांच्या आयशर टेम्पोमधून कोल्हापूर ते मुंबई माल घेऊन जात होते. सोमवारी पहाटे तीन तरुणांनी मुंबईकडे जाण्याच्या बहाण्याने हात करून फिर्यादी यांच्या टेम्पोला थांबवले. फिर्यादी यांनी तिघा तरुणांना प्रवासी म्हणून घेतले. पुनावळे अंडरपास ब्रिजवर आल्यानंतर तिघा प्रवासी तरुणांनी फिर्यादी यांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवला. जबरदस्तीने फिर्यादीकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण चार हजार 100 रुपयांचा ऐवज काढून घेतला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button