पिंपरी / चिंचवड

बांधकाम व्यवसायात भागीदाराची सव्वा पाच कोटींची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

बांधकाम व्यवसायात भागीदार असलेल्या एका भागीदाराची दोन भागीदार आणि अन्य दोघांनी मिळून सव्वापाच कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 4 डिसेंबर 2019 ते 28 मार्च 2022 या कालावधीत माउंट वर्ट वाकड येथे घडला.

संजय पांडुरंग कलाटे (वय 42, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंत वल्लभदास कनेरिया (रा. पाषाण, पुणे), धीरजलाल गोरधनदास हंसालिया (रा. बाणेर, पुणे), अजय बिपीनचंद जव्हेरी, धरती अजय जव्हेरी (दोघे रा. बाणेर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जयंत व धीरजलाल हे माउंट वर्ट असोसिएट या फर्मचे बांधकाम व्यवसायात भागीदार आहेत. जयंत आणि धिरजलाल यांनी आरोपी अजय व धरती यांच्याशी संगनमत करून 16 फ्लॅटचे बनावट कागदपत्र तयार केले. त्यावर फिर्यादी यांची सही न घेता आरोपी अजय व धरती यांना कमी किमतीत 10 कोटी 55 लाख रुपयांना विकले.

ही रक्कम फर्मच्या नावाने जमा करणे आवश्यक असताना सहा कोटी 32 लाख 44 हजार 250 रुपये जमा केले. उर्वरित चार कोटी 22 लाख 55 हजार 750 रुपयांचा अपहार केला. तसेच आरोपी अजय आणि धरती यांनी तुटपुंज्या किमतीत खरेदी केलेले फ्लॅट वाढीव किमतीला विकून त्यातून एक कोटी दोन लाख 70 हजार रुपये नफा कमावला. आरोपींनी संगनमताने आर्थिक लाभापोटी बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादी यांची सही व मान्यता न घेता एकूण पाच कोटी 25 लाख 25 हजार 750 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button