breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

#ParthAjitPawarbirthday: पिंपरी-चिंचवड शहर विकासाचे पार्थ पर्व !

  • माजी आमदार विलास लांडे यांनी अशा दिल्या पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पिंपरी | महाईन्यूज 

राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची गणना केली जाते. उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून हे शहर नावारुपाला आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरनीय शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री आदरनीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट झाला. पिंपरी-चिंचवडला दादांनी हायटेक सिटी (स्मार्ट सिटी) बनविले. त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावरील जबरदस्त पकड विकासाची दिशा ठरवते. त्यांच्या योगदानामुळे विकासाला चालना मिळाली. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा देखील विकास तेवढ्याच झपाट्याने होत गेला. हे सामान्यातला सामान्य नागरिक सुध्दा नाकारू शकत नाही. “अजितदादा म्हणजेच विकास आणि विकास म्हणजेच अजितदादा असे समिकरण” आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून अजितदादांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांना साथ देत विकासाच्या पाऊलवाटा आणखीन रुंदावण्याची गरज होती. कारण, विकास हीच पवार कुटुंबियांची ओळख आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन झाली. पुढे आदरनिय शरद पवार साहेबांनी त्याला मूर्त स्वरूप दिले. मोठमोठ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना याठिकाणी पाचारण केले. हिंजवडी आयटी हबची स्थापना केली. जागतीक दर्जाच्या कंपन्या याठिकाणी आल्या. नोकरी, व्यवसाय, उद्योग करण्यासाठी शहराकडे तरुणांचा कल वाढला. आज लाखो तरुणांना नोक-या उपलब्ध झाल्या आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे अपवादात्मक काही व्यवसाय ठप्प झाले असतील. परंतु, पवारसाहेबांच्या दुरदृष्टीमुळे शहराच्या विकासाला गती मिळाली. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्याच्या तुलनेत महापालिकेच्या सुविधा अपु-या पडू लागल्या.

आदरनिय अजितदादांनी लक्ष घालून महापालिकेच्या माध्यमातून शहरात नागरी सुविधा भक्कम करण्यावर भर दिला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला देखील अजितदादांनी न्याय दिला. अनेकांना महापौर, उपमहापौर केले. स्थायी समिती सभापती केले. वेगवेगळ्या विषय समित्यांवर अध्यक्ष पदाची संधी दिली. पुढे 2014 मध्ये राज्यात सत्तांतर होताच त्यातील काहींनी सत्तेच्या लालसेपोटी अजितदादांची साथ सोडली. त्यामुळे शहराच्या विकासकामात त्यांचा अडथळा ठरू लागला. शहराचा विकास झाला पाहिजे, या ध्येयापोटी सत्ता असो वा नसो आम्ही आदरनिय पवारसाहेब आणि अजितदादांची साथ सोडण्याचा विचार सुध्दा मनात आणला नाही. त्यामुळे पडत्या काळात राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणारे व खंबीर साथ देणारे कोण याची पारख आदरनिय शरद पवारसाहेब आणि अजितदादा करतील हे नक्कीच.

शहराच्या विकासाचा साक्षिदार

शहराच्या जडणघडणीमध्ये होणा-या प्रत्येक विकासकामाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी साक्षिदार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून शहरात भक्ती-शक्ती समुह शिल्प उभारले. सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर सुरू केले. बीआरटी रस्ते, 12 मीटर, 18 मीटर, 90 मीटर, 60 मीटर, 120 मीटरचे रस्ते विकसित केले. वाहतूक कोंडीचा ताण 80 टक्क्याने कमी केला. शहराच्या वैभवात भर घालणारा नाशिक फाटा येथील भव्यदिव्य असा जेआरटी टाटा उड्डाणपुल बांधला. दुर्गा टेकडी उद्यान, अप्पू घर, कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय विकसित केले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एसटीपी प्रकल्प उभे केले. सामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षणाची कमतरता भासू नये म्हणून पालिकेच्या माध्यमातून 108 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा सुरू केल्या. भोसरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिजाऊ उड्डाणपूल बांधला. शिवसृष्टी म्युरल्स, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारले. वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर संतशिल्प उभारण्याचे काम हाती घेतले.

नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. सांस्कृतीक क्षेत्र टिकविण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदीर विकसित केले. नुकतेच सांगवी येथे देखील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारले. झोपडपट्टी निर्मुलन करण्यासाठी जेएनएनयूआरएम पुनर्वसन प्रकल्प राबविला. त्यासाठी पवार साहेबांनी केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. आज हजारो रहिवाशांची निवासाची सोय झाली. मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रवादीने मूर्त स्वरूप दिले. अशी असंख्य विकास कामे आदरनिय पवार साहेब आणि अजित दादांनी या शहराला दिली.

पवार साहेब आणि अजित दादांच्या माध्यमातून शहरात जो विकास झाला. त्याला पार्थ पवारच गती देऊ शकतात. या तरुण तडफदार नेतृत्वाला काम करण्याची संधी देणे आपल्या सर्वांचे अद्य कर्तव्य आहे. विदेशात शिक्षण घेऊन पिंपरी-चिंचवडसह मावळ मतदार संघाच्या विकासाचे चित्र पालटून दाखवण्याची हिम्मत उराशी बाळगून पार्थ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उतरले होते. त्यांना दादांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी साथ देणे गरजेचे होते. कारण, ज्या वेगाने शहराचा विकास पुढे झंजावत होता. तो आज रेंगाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील कित्येक प्रकल्प आज सत्ताधा-यांना पाच वर्ष पूर्ण होत असताना देखील मार्गी लावता आले नाही. ही कामे केवळ पवार कुटुंबातील नेतृत्वाच्या मदतीनेच मार्गी लागू शकतात. विकास हीच पवार कुटुंबियांची ओळख आहे. शहराचा विकास म्हणजेच तुमचा-आमचा विकास आहे. म्हणूनच पार्थ पवार यांच्यासारख्या तडफदार नेतृत्वाची पिंपरी-चिंचवडला आगामी काळात गरज आहे. हे उमदे नेतृत्व पुन्हा नव्याने विकासाचा झंजावात घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये येणार, याची खात्री आहे. आगामी निवडणुकांमध्ये विकास कामांची दुरदृष्टी घेऊन चालणारे आणि लढणारे एकनिष्ठ मावळे ओळखणे गरजेचे आहे. त्यांच्या खंबीर साथिने शहराच्या विकासात आणखी भर पडेल. असे एकनिष्ठ मावळे आदरनिय पवार साहेब, अजित दादा आणि पार्थ दादा पवार हे नक्कीच ओळखतील. या मावळ्यांच्या साथिनेच पक्ष बळकट करून शहर विकासाला चालना द्यावी, याच पार्थ दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लेखन,

मा. श्री. विलास विठोबा लांडे,

माजी आमदार, भोसरी विधानसभा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button