breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्थ पवार यांचे फटकारे : हीच का तुमची स्मार्ट सिटी? पिंपरी- चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपाला सवाल!

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या नावावर एक हजार कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा चुराडा केला आहे. पण प्रत्यक्षात साडेचार वर्षात एकही प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल झाला नाही. त्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी अचूक बोट ठेवत टिट् करत ‘हीच का तुमची स्मार्ट सिटी’ असा सवाल उपस्थितीत करुन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठविला आहे.

भाजपने ‘ना भय ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाने दूॅंगा, पारदर्शक कारभाराची स्वप्न दाखवत महापालिकेवर सत्ता मिळविली. सलग पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले. मात्र, सत्तेत येण्यापुर्वी पिंपरी-चिंचवडकरांना दिलेल्या आश्वासनांचा भाजपच्या स्थानिक कारभा-यांना पुर्णपणे विसर पडला आहे. शहरातील नागरिकांच्या अनधिकृत घरांचा प्रश्न, संपुर्ण शास्तीकर माफीचा प्रश्न, रेडझोन व बफर झोन प्रश्न, पवना, मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, स्वच्छ व मुबलक चोवीस तास पाणी, सीसीटीव्ही यंत्रणा यासह असंख्य प्रश्नाकडे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दुर्लक्ष केले आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांवर तब्बल एक हजार कोटीचा निधी खर्च होत आहेत. एरिया बेस डेव्हलमेंट आणि पॅन सिटी प्रकल्पावर करोडो रुपये खर्च होवून नागरिकांच्या सेवेत अजून एकही प्रकल्प दाखल झाला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी अचूक निशाना साधत हीच का तुमची स्मार्ट सिटी म्हणून प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच पवार यांनी टि्ट करत म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडमधील लोक आपल्या घराकडे पाऊल टाकताच, तुटलेले रस्ते, खड्डे, सतत प्रलंबित असलेले विकास प्रकल्प, अनुपस्थित ट्रॅफिक लाईट यांनी त्यांचे स्वागत केले. नियोजित शहराचे अवशेष बनले आहे. ज्यांनी शहराला वैयक्तिक जागेत बदलले त्यांना PCMC चे लोक नाकारतील.

विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी पार्थ पवारांकडे?

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक घटनेवर पार्थ पवार स्वत: लक्ष ठेवून आहेत. नागरिकांच्या प्रश्नावर ते टिट् करत महापालिकेतील भाजपच्या कारभारावर प्रश्न उपस्थितीत करत आहेत. भाजपसह प्रशासनावर प्रश्नांच्या माध्यमातून ताशेरे ओढत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हे नेमकं काय करत आहेत. शहरातील प्रश्न पार्थ पवारांना दिसत आहेत. मग विरोधी पक्षनेत्यांना दिसत नाहीत का?, पार्थ पवार स्वत: शहरातील प्रत्येक प्रश्नांवर प्रशासन आणि भाजपला जाब विचारत असताना विरोधी पक्षनेते म्हणून विरोधाची भूमिका निभावण्यात मिसाळ हे कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पार्थ पवारांना स्वत: विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलीय का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button