breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला; एक ठार, चार जखमी

मुंबई – मुंबईत रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली आणि यासोबतच वांद्र्यात इमारत दुर्घटना घडली. वांद्रेमधील खेरवाडी परिसरातील रझाक चाळीत रात्री दीडच्या सुमारास चार मजली इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे भागात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्रीच्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे. जिथे इमारतीचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे, शिवाय दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही बरसत होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्याताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button