breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेरच्या ‘त्या’ मुलीवर अखेर अंत्यसंस्कार; अज्ञातांवर अत्याचार व हत्येचा गुन्हा दाखल

अहमदनगर – पारनेर तालुक्यातील जवळा येथे झालेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्यावर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी गाव बंद ठेऊन आरोपीला तत्काळ पकडण्याची मागणी केली. दरम्यान, काल सायंकाळी उशिरा या पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पारनेर पोलीस ठाण्यात हत्या आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. यावेळी अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि त्यानंतर संपूर्ण पारनेर तालुक्यात खळबळ उडाली. तिच्या मृतदेहाजवळ चाकू आणि टॉवेलचा बोळा आढळला होता. त्यामुळे तिच्यावर अत्याचार करण्यात आला असावा अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरा उलगडा होणार आहे. या घटनेची माहिती कळताच आ. निलेश लंके दुपारपासून जवळा गावात उपस्थित होते. त्यांनी पीडित कुटुंबियांना आधार देत न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक अहवालानुसार मुलीचा मृत्यू हा गुदमरून झाल्याचे म्हटले आहेे. मात्र त्याचबरोबर अहवाल आल्यानंतर इतर बाबी स्पष्ट होती. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात काल सायंकाळी हत्या आणि अत्याचार याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button