Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

कोकणातील चिपळूण जवळील मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी/ चिपळूण : कोकणातील चिपळूण जवळील मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या चार तासांपासून चिपळूणमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दरड कोसळून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कुठल्या मार्गाने  प्रवास करावा असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर आम्ही तुम्हाला यासंबंधी माहिती देणार आहोत.

पहिला पर्यायी मार्ग
सध्या हलक्या वजनाची वाहतूक कळंबस्ते – आंबडस- लोटे मार्गे वळविण्यात आली आहे. परशुराम घाटाला पर्याय म्हणून हा सगळ्यात सोपा व सरळ मार्ग आहे.

दुसरी पर्यायी मार्ग
दरम्यान, तुम्ही जर मुंबईतून निघाला असाल तर मुंबईपासून सुरू होऊन, तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने पुण्याला जाऊन मग तुम्ही शेवटी गोव्याला पोहोचण्यापूर्वी सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव मार्गे जाण्यासाठी NH 4 चा वापर करू शकता.

तिसरा पर्यायी मार्ग
मुंबईपासून सुरू होणारा हा मार्ग तुम्हाला गोव्यात पोहोचण्यापूर्वी पनवेल, पेण, कोलाड, खेड, चिपळूण, पाली आणि सावंतवाडी मार्गे घेऊन जाईल.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा अभिप्राय मागवला
परशुराम घाटामध्ये दोन ठिकाणी असलेला धोका, गाड्यांच्या व्हायब्रेशननेही दरड कोसळण्याचा धोका कायम आहे त्यामुळे हा घाटाबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. पेढे ग्रामस्थांची मागणी या सगळ्याचा विचार करुन परशुराम घाटातील पावसाळ्यातील वाहतूकीबाबत एक दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

तुम्ही बसने प्रवास करत असाल तर सागरी मार्गेही करू शकता प्रवास….
या घाटाला व हाय-वे ला पर्याय म्हणून खेड भरणा नाका मार्गे दापोली, दाभोळ, सागरी मार्गावर असलेल्या दाभोळ फेरीबोट मार्गे गुहागर किंवा चिपळूण येथे जाता येते. हा मार्ग थोडा वळसा पडणारा आसला तरी हा मार्गे चांगला आहे. कशेडी घाटातुही तुम्हाला प्रवास टाळायचा असेल तर तिसरा मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात येताना माणगावच्या पुढे आल्यावर गोरेगाव किंवा टोळ मार्गे म्हाप्रळ येथून फेरीबोट मार्गे दापोलीतून दाभोळ फेरीबोट येथून गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व पुढे सिंधुदुर्ग येथेही या सागरी मार्गे जाता येईल. हा एक वेगळा मार्गे अनुभवत पर्यटनही अनुभवता येईल. दरम्यान, मंडणगड दापोली तालुक्याना थेट मुंबई-गोवा हायवेला रायगड गोरेगाव मार्गे जोडणारा आंबेत पूल हा दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वी याच राष्ट्रीय महामामार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्याला भेगा पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत. वास्तविक हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार असेल तर प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करायला हवा. पेढे ग्रामपंचायत सरपंच प्रावीण पाकळे यांनी प्राशासनाला निवेदन देत अनेक व्यथा भिती व्यक्त करत हा परशुराम घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी अशी लेखी मागणी सोमवारी ४ जुलै रोजी केली.

या ठिकाणी करत असलेल्या कल्याण टोलवेज कंपनीच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. संबंधितांची चौकशी करून जर काही कामात संशयास्पद आढळल्यास जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. एप्रिल ते मे दरम्यान महिन्याच्या कालावधीत तब्बल एक महिना हा परशुराम घाट दिवभर काहीकाळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याचा धोका कायम आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button