breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; AK-47सह ग्रेनेड जप्त

नवी दिल्ली |

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लक्ष्मी नगरमधील रमेश पार्कमधून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. तो भारतीय नागरिक असल्याचे बनावट ओळखपत्र घेऊन वावरत होता अशी माहिती समोर आली आहे. या दशतवाद्याचा दिवाळी आणि आगामी सणांच्या आसपास दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग होता असे सांगितले जात आहे. ही कारवाई करत दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उघडकीस आणला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एक एके -४७ रायफल, ६० राऊंड काडतुसे, एक हातबॉम्ब, दोन अत्याधुनिक पिस्तूल आणि ५० राऊंड काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद असरफ आहे. तो मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा आहे. त्याच्यावर बेकायदेशीर कारवाई (प्रतिबंध) कायदा, स्फोटक कायदा, शस्त्र कायदा आणि इतर तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा दहशतवादी दिल्लीच्या लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क परिसरात राहत होता. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या घराची झडती घेतली असता तिथून अनेक प्रकारची शस्त्रे जप्त करण्यात आली.

मोहम्मद असरफ नेपाळमार्गे भारतात पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. अली अहमद नूरी असे नाव बदलून मोहम्मद असरफ दिल्लीत राहत होता. अशरफ अलीला आयएसआयने दिल्लीसह भारताच्या इतर भागात हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले होते असे सांगितले जात आहे. मोहम्मद असरफ कडून बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी दिल्लीत सणासुदीच्या काळात दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला होता. सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी गुप्तचर सूत्रांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनीही शनिवारी उच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दहशतवादी हल्ल्याचे इनपुट मिळाल्यानंतर अलर्टही देण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button