Uncategorized

लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित १२ शक्तिपीठांच्या पादुका उद्या भाविकांना दर्शनासाठी खुल्या

– सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत लाभ घेण्याचे बालवडकरांचे आवाहन

पुणे | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजप सदस्य लहू बालवकड यांच्या पुढाकाराने पुण्यातील बालेवाडी परिसरातील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम उद्या (शुक्रवारी) १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत या दर्शन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकर यांनी केले आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यामुळे, राजकारण नाही तर समाजकारण करून मोठ व्हायचय असा घ्यास मनी बाळगून लहू बालवडकरांनी समाजकार्याचा विडा हाती उचलला. एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या लहुला सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या हाल अपेष्टांची जाण होती. त्यातूनच प्रेरणा घेत बालवडकरांनी समाजसेवेचा विडा हाती उचलतं २००७ पासून दहिहंडी उत्सव, नवरात्री उत्सव आणि अशा अनेक सण उत्सवाचे भव्य स्तरावर आयोजन केले होते. तसेच कोरोना संकटकाळात दररोज मोफत जेवण, सोसायट्यांमधील नागरिकांना घरपोच मोफत भाजीपाला, बाणेर, बालेवाडी येथिल नागरिकांना रेशन किट वाटपांसारखे समाजकार्य अविरतपणे पार पाडले आहे. त्यातच आता उद्या (शुक्रवारी) भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा पुणेकरांसह, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळूंगेतील भाविकांसाठी घडवून आणला आहे.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी बिघडली असताना आता भारतातील विविध तीर्थक्षेत्रावर जावून नतमस्तक होणे शक्य नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे, लहू बालवडकर यांनी भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक-भक्तांना उद्या (शुक्रवारी) खुल्या राहणार असून एकाचवेळी १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, लहू बालवडकर यांनी २०१९ साली अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला होता. उद्या आयोजित करण्यात आलेला दर्शन सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी भक्ति-भावाने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू बालवडकर यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button